Wednesday, 7 October 2015



                           पत्रकारिता काय असते मला ठाऊक नाही होते.  मी लहान असतानाच मला सामाजिक काम करण्याची फार आवड होती. समाजामध्ये कोणावर काही अन्याय होत असेल तर तो मी सहन नाही करु शकत.  समाजासाठी काहीतरी कारायची जिद्द होती. मला घरचे नेहमी ओरडत असायचे कारण कि जे काम मी हाती घेतलेले असायचे ते काम पुर्ण करण्यापर्यंत व त्या समोरच्या व्यक्तीचे समाधान झाल्याशिवाय मी घरी जात नसायचो.. तरी पण समाजसेवा करण्याची आवड आहे. हे मी घरच्यांना सांगितले तर मला बोलतात तु एकटा समाजासाठी काय करु शकतो. ते मला बोलतो बोलता बोलायचे तु काय पत्रकार आहेस का राजकारणी आहेत का मोठा समाजसेवक आहेस का तु समाजासाठी लढायला.. गुपचुप कॉलेजकडे लक्ष दे आणि काही तरी सरकारी नोकरसाठी प्रयत्न कर. त्याच्या या बोलण्यात मला त्यांचे माझ्यावरचे प्रेम व काळजी मला दिसत होती. त्यांच्या या बोलण्याने मला विचार करायला मजबूर केले. तर विचार केला की राजकारणात पडून समाजसेवा करुन, राजकराणासाठी लागेल तो पैसा माझ्याक़डे नव्हता.... होती ती  फक्त जिवलग मित्रांचा साथ. त्यानंतर विचार केला समाजसेवक बनुया पण समाजसेवक बनायचं म्हणजे अगोदर लागते ती ओळख... आता ओळक निर्माण करायची असेल तर ती फक्त एकत त्यांच्या माध्यामातून बनु शकते ती म्हणजे पत्रकारिता .
तर माझा प्रश्न होता. त्यासाठी जर निर्णय चुकला तर पुर्ण आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. त्यासाठी समाजासाठी काहीतरी करायचे असेल तर अगोदर आपल्याला स्वत:ची ओळख निर्माण करावी लागेल. अगोदर पत्रकारीता मध्ये राहुन स्वत:ची ओळख निर्माण करावी लागेल. त्यानंतर समाजासाठी ओळखीचा फायदा समजाला करुन अशाप्रकारे समाजसेवक पण मी बनु शकतो. आणि समाजाकील लोकांनसाठी व तरुणांसाठी मी काहीतरी करु शकतो. अशाचप्रकारे समाजसेवक बनून जर समाजाची सेवा करत गेलो तर राजकारणात पण आपल स्थान निर्माण होऊ शकतो. तर पण सर्वात अगोदर पत्रकारिता करायचा निर्णय घेतला. मला घरच्यांच्या बोलण्याने मला नविन दिशा मिळाली आणि न कळत मला ते माझ्या जीवनाचा हेतू मला समजलं मी आभारी आहे त्यांचा की त्यांनी मला बोले की तु काय राजकारणी आहेस का?, समाजसेवक आहेस का?, पत्रकार आहेस का? मी नेहमी त्यांच्या ऋणी राहीण. कारण का त्यांच्यामुळेच मला या तीनही क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. कदाचित तेव्हा ते मला बोलले नसते तर मी फक्त स्वत:साठी मर्यादित राहिलो असतो..

                   प्रशांत पाटील पत्रकार